गाव मामी ठरतेय प्रेक्षकांसाठी खास आकर्षण
कणकवली (प्रतिनिधी) : सन मराठी चॅनेलवर सुरु झालेल्या वेतोबा ह्या मालिकेत कणकवली च्या अभिनेत्री अक्षता कांबळी ह्या गावमामी म्हणून भूमिका साकारत आहेत. गावमामी सारखा प्रत्येक गावात वाडीत असा इरसाल नमुना असतोच ,गावात फिरून प्रत्येक घरातील माहिती मिळवणे हे गाव मामीचे काम आहे ,आपल्या पोटाला मुलं नाही तरी गावची मुलं हीच आपली मुलं अस समजणारी गावमामी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते ,गावमामी बरोबर भोळा मामा साकारणारे कलाकार हे सुद्धा कणकवली चे विवेक वाळके आहेत ,आपल्या ला गावमामी ही भूमिका उत्तम प्रकारे वटवण्यासाठी मालिकेचे निर्माते सुनील सावंत भोसले ,निलेश मयेकर तसेच दिग्दर्शक नितीन काटकर सर मेहनत घेतात असे अक्षता कांबळी ह्यांनी सांगितले.










