कुडाळ (अमोल गोसावी) : नेरूर मंडल अधिकारी म्हणून धनंजय सिंगनाथ यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर तसेच गावातील अन्य नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रुपेश पावसकर यांनी नेरूर गावात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच शेतीचे नुकसान झाले असल्याची बाब मंडल अधिकारी म्हणून धनंजय सिंगनाथ यांच्या निदर्शनास आणून दिली. या नुकसानाचे त्वरित पंचनामे तयार करून शासन दरबारी पाठवून नागरिकांना मदत मिळवून द्यावी, अशी सूचना रुपेश पावसकर यांनी केली.












