रत्नागिरी (प्रतिनिधी) : येथील माजी खासदार, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. बापूसाहेब परुळेकर (वय 94) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी 3 वाजता श्रीमान भागोजीशेठ किर अमरधाम येथे अंत्यविधी होणार आहेत. पूर्वी जनता पार्टीचे बापूसाहेब लोकसभेत दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. ऍड. बापूसाहेब आणीबाणीच्या वेळी मिसाखाली 16 महिने तुरुंगात होते. रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे ते जिल्हा अध्यक्ष होते. रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते चेअरमन होते. त्यांच्या पश्चात वकील बाबा परुळेकर यांच्यासह मुलगे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.












