कणकवली (प्रतिनिधी) : सरधोपट करिअर निवडण्यापेक्षा हटके करिअर निवडा तर लवकर यशस्वी व्हाल असा संदेश क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाचे नेते, राज्यकार्यकरिणी सदस्य , पत्रकार विजय गांवकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाने आयोजित दहावी , बारावी तथा इतर परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात बोलत होते .सर्वांनी करिअरचा निवडलेला मार्ग न स्वीकारता थोडाश्या हटके मार्ग मार्गावर असलेले करिअर निवडावे आणि निवडलेल्या करिअरमध्ये सर्वोच्च स्थान मिळवण्याचा प्रयत्न करावा,असे मार्गदर्शन विजय गावकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज (मुंबई) , सिंधुदुर्ग जिल्हा विभागाचा समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कणकवली येथील मातोश्री हॉल येथे उत्साहात संपन्न झाला.या गुणगौरव सोहळ्याच्या व्यासपीठावर क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाचे मुंबई मध्यवर्ती उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर, मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य तथा पत्रकार विजय गांवकर,सिंधुदुर्ग अध्यक्ष सुर्यकांत घाडी,सचिव प्रदीप घाडी,सहसचिव बुधाजी घाडीगांवकर, खजिनदार सुनिल गांवकर, सदस्य विलास गांवकर,कैलास घाडीगांवकर,अशोक घाडी,सत्यवान घाडीगांवकर, दत्तगुरु गांवकर,कळसुलकर गुरुजी,मध्यमुंबई विभागाचे माजी अध्यक्ष सदानंद घाडीगांवकर, भांडुप उपाध्यक्ष सुरेश गांवकर,आडेलकर गुरुजी,उत्तम गांवकर,कृष्णा घाडीगांवकर,सुभाष गांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या गुणगौरव सोहळ्यात घाडीगावकर समाजातील ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५ % पेक्षा अधिक आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक गुण मिळाले त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ५ वी व ८ वी स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी, नवोदय निवड यादीतील विद्यार्थी, इंजिनिअरिंग, मेडिकल, बी. फार्मसी तसेच इतर क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी घाडीगांवकर समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करीत उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.












