कायमस्वरूपी शिक्षक मिळण्यासाठी साठी रामेश्वर नगर जि.प.शाळा खारेपाटण बंद आंदोलन करणार

पालकांच्या सभेत शाळा व्यवस्थापन समितीचा निर्णय

खारेपाटण (प्रतिनिधी) आपल्या दर्जेदार शिक्षणासाठी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या व गुणवत्ता पूर्ण शाळांच्या यादीत असलेल्या खारेपाटण रामेश्वर नगर जि.प शाळेच्या विद्यार्थ्यांची एकच शिक्षक शाळेत असल्याने शिक्षणाची हेळसांड सुरू आहे. दरम्यान वारंवार शिक्षक मागणी करून देखील कायमस्वरूपी शिक्षक येत्या २ दिवसात शिक्षण विभागाने न दिल्यास ३ ओगस्ट २०२३ पासून शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा येथील पालकांनी घेतला असल्याची माहिती रामेश्वर नगर जि.प.शाळा सुधार समितीचे अध्यक्ष श्री मंगेश गुरव यांनी आज दिली.

       दरम्यान रामेश्वर नगर, खारेपाटण जि.प. शाळा व्यवस्थापन समितीची नुकतीच एक सभा पालकांना समवेत शाळेत पार पडली.चालू शैक्षणिक वर्षात या शाळेत ४२ विद्यार्थी पटसंख्या असूनही सद्या केवळ १ शिक्षकवरच शाळा सुरू आहे. दुसरा कायमस्वरूपी शिक्षक मिळणे गरजेचे असताना फक्त कामगिरी वर बदली शिक्षकाची नेमणूक शिक्षण विभागाने केली होती.मात्र गेल्या २७ तारीखला येथील शाळेत कमगीरिवर काढलेल्या श्रीम तांदळे या महिला शिक्षिकेलाही पुन्हा आपल्या मूळ शाळेत हजर होण्याचे आदेश देण्यात आले असल्याने रामेश्वर नगर शाळेतील पालकांसह ग्रामस्थांमध्ये सध्या असंतोष पसरला असून शाळेला जर परिपूर्ण शिक्षक मिळत नसतील तर पालक आपली मुले दुसर्‍या शाळेत घालण्याच्या तयारीत आहेत. या वर तात्पुरता मलमपट्टी म्हणून शिक्षण विभागाने  सेवा निवृत्त शिक्षक आज येथे हजर केला. मात्र पालकांन तो ही मान्य नाही. जी शिक्षिका सुरुवाती पासून येथे कामगिरी वर दिली तीच शिक्षिका कायम स्वरूपी मिळावी अशी पालकांची मागणी आहे. या सभेला निवृत्त मुख्याध्यापक श्री कुबल गुरुजी, सौ मालंडकर बाई श्री ढेकणे गुरुजी, शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षा सौ पराडकर तसेच शिक्षक श्री धुळप सर व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
error: Content is protected !!