सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री देवी आदिष्टी वि. का. स. सेवा सोसायटी लि.खांबाळेचा गौरव

माजी चेअरमन तथा संचालक दीपक चव्हाण, सचिव सिद्धेश रावराणे यांनी जिल्हा बँक संचालकांच्या हस्ते स्वीकारला सन्मान

बँक स्तरावर 100% वसुली हा संचालक मंडळ, सचिव आणि सर्व सभासदांचा सन्मान; चेअरमन प्रविण गायकवाड

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री देवी आदिष्टी वि. का. स. सेवा सोसायटी लि. खांबाळे या सोसायटीला ओरोस येथील शरद कृषी भवन येथे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, रोख दहा हजार शेअर्स देऊन गौरविण्यात आले. सन 2022-2023 या आर्थिक वर्षात संस्थेने बँक स्तरावर 100% वसुली केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन तथा संचालक दीपक चव्हाण, सचिव सिद्धेश रावराणे तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य सोसायटींचे चेअरमन व संचालक उपस्थित होते.श्री देवी आदिष्टी वि. का. स. सेवा सोसायटी लि. खांबाळे 100% वसुली हा संचालक मंडळ, सचिव आणि सर्व सभासदांचा सन्मान आहे असे चेअरमन प्रविण गायकवाड यांनी सांगितले.

error: Content is protected !!