भगवंतगड किल्ल्यावरील सिध्देश्वर मंदिराच्या छपराची पडझड….!

ग्रामपंचायत सदस्य केदार(पप्पू)परुळेकर यांचे समाजभान

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावातील ऐतिहासिक भगवंत गडकिल्ल्यावरील सिध्देश मंदिराच्या छपराच्या भागाची काही दिवसापूर्वी वादळी वार्याने पडझड झाली.सदरचे वृत्त असे कि चिंदर गावातील दक्षिणेस असलेला व रमाई नदी तटी वसलेला ऐतिहासिकतेच्या पाऊल खूणा लाभलेला चिंदर-भगवंत गावचा मानबिंदू, पुरातन भगवंतगड किल्ला. या किल्ल्यावर लोकांची श्रध्दा असलेल्या सिध्देश्वर देवाचे मंदिर अनेक शतके उन, पाऊस, वारा झेलत डौलात उभे आहे. सध्या चालू असलेला सोसाट्याच्या वार्यामुळे जिर्ण झालेल्या मंदिराच्या छपराच्या भागाची पडझड झाली. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य केदार (पप्पू) परूळेकर यांना काही ग्रामस्थांनी हे वृत्त सांगताच तात्काळ परूळेकर यांनी दोन ताडपत्र्या उपलब्ध करून दिल्या. देवस्थानाचे मानकरी गोसावी यांनी स्थानिक ग्रामस्थांन सह तात्पुरती उपाययोजना म्हणून ताडपत्रीने छपराचा भाग झाकण्याचा प्रयत्न केला आहे.

error: Content is protected !!