शिवराज सावंत,सुर्यकांत साळुंके,गुरुनाथ ताम्हणकर,तेजल ताम्हणकर यांना संयुक्त प्रथम क्रमांक
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “माझे माहेर पंढरी”
या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेला उत्स्पुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत शिवराज सावंत, सुर्यकांत साळुंके, गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर यांनी संयुक्त प्रथम क्रमांक मिळविला.
संस्था अध्यक्ष अँड. देवदत परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे ऑनलाईन बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना ऑनलाईन प्रशस्तीपत्रके वितरीत करण्यात आली. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक आर्या इळकर, ऋतुजा केळकर, अनुष्का वस्त, संजकुमार रोगे, विशाखा पालव, तिलोत्तमा गोडबोले, संतोष राऊत, प्रकाश उनकुले, दीपक गुंडये, सानिका वायंगणकर, श्रीकांत महाजन यांनी संयुक्त मिळविला.
तृतीय क्रमांक रोहिणी मसुरकर, वसुधा पंडित, प्रिया कुबल, पल्लवी साईल, वैष्णवी आचरेकर, जानवी ढोलम, किर्ती आंबेरकर, अर्चना धुत्रे यांनी मिळविला. उत्तेजनार्थ क्रमांक सुनिल माळवदे, एकनाथ परब, शालीनी गवार, हर्षल सातार्डेकर, जान्हवी मण्यार, घनाली चव्हाण, निष्ठा कर्ले, अनुष्का मण्यार, शमिका आंबेरकर, राम धुमाळ, शिल्पा ठाकर या स्पर्धकांनी मिळविला.












