वेंगुर्ले तालुका अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अबिद नाईक यांचे प्रतिपादन
एम के गावडे, प्रज्ञा परब यांची बैठकीला उपस्थिती
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुका अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेची बैठक राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एम के गावड़े यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काकाकुडाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सांगितले कि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन आपण संघटना वाढवणार आहोत. सर्वाना विश्वासात घेऊन काम करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रणी नाव म्हणून एम के गावडे यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. गावडे यांनी श्रीमती प्रज्ञाताई परब यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काथा उद्योग सुरू केला. या उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिला बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे बहुमूल्य कार्य त्यांनी केले आहे.
श्री गावडे यांनी यापूर्वी जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वीरित्या काम केले आहे. प्रज्ञा ताई यांनीही जिल्हा बँकेचे संचालक म्हणून सरकार क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा विकसित व्हावा, विशेषतः वेंगुर्ला तालुका पर्यटन दृष्ट्या जगाच्या नकाशावर यावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असून श्री गावडे व प्रज्ञाताई यांचे सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठीचे संकल्प आहेत ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे ग्वाही अबिद नाईक यांनी दिली. जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी बोलताना सांगितले की राष्ट्रवादी संघटना एकसंघपणे वाढविण्याचे काम आम्ही चालू केले आहे. काही कालावधीत आम्ही राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे नियोजन करणार आहोत. एम के गावड़े यांनी बोलताना सांगितले की राष्ट्रवादी पक्ष संघटना एक जुटीने वाढवणार आहोत.आंबा काजू शेतकरी यांचे प्रश्न सोडविन्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही एम के गावडे म्हणाले. यावेळी माजी जिल्हा बैंक संचालक सौ प्रज्ञा परब,माजी जिल्हा बैंक संचालक प्रमोद धुरी , वेंगुर्ला राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, पावसकर, राष्ट्रवादी कणकवली शहराध्यक्ष इम्रान शैख़, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य सावळाराम अनावकर गुरूजी, राष्ट्रवादी कणकवली माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, माजी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे,सूरज परब,सुभाष तांडेल,दादा गावड़े आदि उपस्थित होते.












