श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्या वतीने माजी सैनिक निलेश भोसले आणि सचिन पुजारे यांचा सत्कार…!

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचराने क्रांती दिन आणि ‘माझी माती माझा देश ‘ या अभियानाचे औचित्य साधून स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन, पंचप्रण शपथ इ. कार्यक्रमा बरोबरच आचरे गावातील श्री. निलेश भोसले व श्री.सचिन पुजारे या दोन माजी सैनिकांचा ज्ञानेश्वरी व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबाजी भिसळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून या उपक्रमाचे महत्व विशद केले. उपाध्यक्ष श्री.अशोक कांबळी यांनी उपस्थित माजी सैनिकांची मुलाखत घेऊन त्यांचे थरारक प्रसंग उपस्थितांना ऐकविले. क्रांतिदिनाचे महत्वही श्री. कांबळी यांनी विशद केले. सदस्या सौ. उर्मिला सांबारी यांनी क्रांतिकारक कै.नारायण सांबारी (त्यांचे वडील ) यांचे काही थरारक प्रसंग उपस्थितांना ऐकविले. कार्यवाह श्री. अर्जुन बापर्डेकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास सर्व कार्यकारिणी व सांस्कृतिक समिती सदस्य कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ.विनिता कांबळी यांनी केले.

error: Content is protected !!