वेताळ बांबर्डे पुलावर कंटेनर – डंपरमध्ये भीषण अपघात

कुडाळ (अमोल गोसावी) : मुंबई-गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पुलानजीक रस्त्याच्या कामासाठी उभा असलेल्या डंपरला कंटेनर जोरदार धडक दिली. त्यात कंटेनर वाहनचालक जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असलेल्या एका डंपरला गोव्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यात कंटेनरचे समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले असून वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. सदरच्या घटनेनंतर लागली जिल्हा रुग्णालयाकडून रुग्णवाहिका दाखल होऊन भाजपाचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर वाहनचालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबतची खबर कुडाळ पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन तक्रार दाखल केली असून पुढे पोलीस तपास करीत आहेत.

error: Content is protected !!