ही तर सुरुवात आहे,अजून भरपूर प्रवेश घ्यायचे आहेत – माजी खासदार निलेश राणे.

आंबडपाल सरपंचांसह आंबडपाल,वेताळ बांबर्डे,पणदूर गावातील ग्रामस्थांचा भाजप मध्ये प्रवेश.

कुडाळ (अमोल गोसावी) : भारतीय जनता पक्षाच्या विचारांवर आणि केंद्रीय मंत्री राणे साहेब व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावरील विश्वासामुळे अन्य पक्षातून भारतीय जनता पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही तर फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या काळात अजून भरपूर प्रवेश घ्यायचे आहेत.असे प्रतिपादन कुडाळ येथे बोलताना भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आज कुडाळ भाजपा कार्यालय येथे बोलताना केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अमेय जाधव, सृष्टी सावंत ,यांच्या सह गावातील कार्यकर्ते तसेच पणदूर युवासेना कार्यकर्ते ओंकार सावंत, शुभम सावंत, समीर सावंत,आशिष परब, दिनेश वंजारे,अशोक गुरव,वैभव साळुंखे,अजय साळुंखे,पपू दळवी,श्रीराम मेस्त्री,रोहिदास पालव,अनिकेत राऊळ, सागर पालव, भूषण कदम, अक्षय पावसकर, अभि पालव त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सुनिल बांदेकर,आणि वेताळ बांबर्डे गावातील ग्रामपंचायत सदस्य साजूराम नाईक,ओमकार नाईक, अंजली नाईक,पूजा खुळे,माजी सरपंच रोहिणी चव्हाण, रमेश घोगळे, गुरू गायकवाड, निशा चव्हाण, समीक्षा कामतेकर, प्रमिला चव्हाण, शंकर चव्हाण, मोतीराम चव्हाण,निजाम शेख, सीताबाई चव्हाण,मनीष गावडे, रणजित टेमकर, रोहन टेमकर, हरीश तांबे, बंड्या निवतकर, हनुमंत निवतकर, संगीता टेमकर, अशपाक शेख,प्रशांत सावंत, राकेश नलावडे या सर्वांनी आज कुडाळ भाजप कार्यालय येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी विशाल परब, भाई सावंत,संजू परब, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल,नगरसेवक अभि गावडे,विलास कुडाळकर,रुपेश कानडे,निलेश तेंडोलकर,दिपक नारुरकर,विनायक राणे आणि इतर भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!