कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्गात भाजप पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. आज पणदूर येथील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष उपस्थितीत रत्नदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये ओमकार सावंत,शुभम सावंत, समीर सावंत,आशिष परब, दिनेश वंजारे,अशोक गुरव,वैभव साळुंखे,अजय साळुंखे,पपू दळवी,श्रीराम मेस्त्री,रोहिदास पालव,अनिकेत राऊळ, सागर पालव, भूषण कदम, अक्षय पावसकर, अभि पालव यांचा सामावेश आहे. यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल तसेच शक्तिकेंद्र प्रमुख प्रशांत परब, भाजपा बूथ कमिटी पणदूरचे अध्यक्ष दीपक साईल, उपाध्यक्ष प्रदीप जाधव, महिला उपाध्यक्ष राखी गोसावी, बबन निर्गुण, आणि पणदूर गावातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
पणदूर येथील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश












