ऍड.चंद्रकांत सावंत यांची सरकारी अभियोक्तापदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका वकिल संघाचे सदस्य ऍड. चंद्रकांत सावंत यांची सरकारी अभियोक्ता पदी निवड करण्यात आलेली आहे. ते गाव मौजे सोनवडे, ता. कुडाळ येथील रहिवाशी आहे. त्यांचे एल.एल.बीचे शिक्षण पुणे येथे झालेले आहे. त्यांनी आपली वकिलीची सुरवात सन २००८ मध्ये कणकवली येथे सुरू केली. त्यांनी कणकवली तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय सिधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हयातील अन्य न्यायालयांमध्ये दिवाणी व फौजदारी प्रॅक्टीस केलेली आहे. सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परिक्षेसाठी ऍड. चंद्रकांत सावंत यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. व त्यामुळे त्यांनी पहिल्या प्रयत्नात यश संपादन केलेले आहे.ऍड. सावंत यांनी त्याचे यशाचे श्रेय आपले आई वडील. व मित्र परिवाराला दिलेले आहे. त्याचे यशात त्यांना त्यांचे सर्व वकिल मित्रांचे विशेष सहाकार्य लाभलेले आहे. त्यांचे या यशाचे सर्वाकडुन कौतुक होत आहे.

error: Content is protected !!