सनराईज सामाजिक संस्था आडवली यांचे नागपंचमी निमित्त आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : सनराईज सामाजिक संस्था आडवली मालवण यांच्या वतीने नागपंचमीच्या निमित्ताने सापांच्या प्रजाती बाबत जनजागृती या विषयावर ‘संवाद सर्पमित्रांशी’ हा कार्यक्रम आर. ए. यादव हायस्कूल आडवली येथे शनिवार दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ठीक 9 वाजता आयोजित केला आहे. यावेळी चिंदर येथील सर्पमित्र, प्राणीमित्र स्वप्निल गोसावी हे मार्गदर्शन करणार आहेत. स्वप्निल गोसावी हे सर्पान विषयी तालुक्यात जन जागृती करत असतात. त्याच्या कार्याची अनेक सामाजिक संस्थानी दखल घेतली आहे. या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.













