राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून कांदळगाव येथे काजू कलमांची लागवड

मसुरे (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषि अधिकारी मालवण यांच्या वतीने कांदळगाव येथील विश्राम तुकाराम राणे यांचे प्रक्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड योजनेअंतर्गत काजू कलमांची लागवड मालवण तहसीलदार वर्षा झालटे, मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली. राणे यांच्या ०.२५ हेक्टर क्षेत्रावर ५० काजू कलमांची लागवड करण्यात येणार आहे. यावेळी मंडळ कृषि अधिकारी आचरा धनंजय गावडे ,मंडळ कृषि अधिकारी पोईप डि.के.सावंत, पर्यवेक्षक प्रणाली रेडकर, कृषी सहायक सुनिल कदम , मंडळ अधिकारी कोळंब पिंगुळकर निलेश गोसावी आत्मा तंत्रसहाय्यक, कांदळगाव तलाठी, रुद्रा राणे, स्वप्निल साटम व शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!