लोखंडी सळीने डोक्यात प्रहार
सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील श्रीराम वाचन परिसरात एका युवकावर अज्ञात दोघा तरुणांकडुन रॉडने जीवघेणा हल्ला करण्या आला आहे. ही घटना आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तलावाच्या काठावर असलेल्या स्लॅब खाली घडला. संबधित तरुण बेशुध्द पडल्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही. दरम्यान मारहाण केल्यानंतर दोघांनीही तेथून पळ काढला. याबाबतची माहीती पोलिसांना देण्यात आल्यानंतर वाहतूक पोलिस मयूर सावंत यांनी त्या ठिकाणी धाव घेवून जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले. याबाबत अधिक माहीती अशी की श्रीराम वाचन मंदीर समोर असलेल्या स्लॅबच्या खाली संबधित तिघे युवक भांडत होते. यावेळी भांडणाचे पर्यावसान मारहाणीत झाले. त्यांनतर त्या दोघा युवकांनी लोखंडी रॉड घेवून त्या युवकाच्या डोक्यात वार केले. तो गंभीर जखमी होवून बेशुध्द पडल्याचे लक्षात येताच त्याला तेथेच टाकून त्याने पलायन केले. हा प्रकार अॅड अनिल निरवडेकर यांचे ज्यूनियर चैतन्य सावंत यांनी पाहिला त्यांनी याबाबतची माहीती पत्रकार अमोल टेंबकर यांना दिली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. यावेळी काही वेळातच त्याठीकाणी वाहतूक पोलिस मयुर सावंत आले त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी विनायक माळकर नामक रिक्षा चालकांची गाडी आणून तेथे जमलेल्या हमालाच्या सहाय्याने त्या जखमी तरुणाला त्यांनी तात्काळ कुटीर रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांना वाहतूक पोलिस सुनिल नाईक, चैतन्य सावंत व अन्य सहकाऱ्यांनी सहकार्य केले. दरम्यान हल्ला झालेल्या ठिकाणावरून संबधित तरुण हा त्या ठिकाणी आला मात्र रक्तबंबाळ आणि अत्यवस्थ झाल्यामुळे तो पुन्हा नारायण मंदीरच्या समोर असलेल्या फुटपाथवर पडला.परिसरात रक्ताचे डाग पडले होते.हा प्रकार नेमका कशासाठी झाला? हे कळू शकले नाही ते तिघेही मजूर असण्याची शक्यता आहे. आणि मदयधुंद अवस्थेत हा हल्ला केला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबतची माहीती मिळाल्यानंतर पोलिस निरिक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.












