चौके येथील जीर्ण धोकादायक विद्युत पोल बदलायला विद्युत मंडळाचा वेळकाढूपणा

उपसरपंच पी.के.चौकेकर यांनी व्यक्त केली नाराजी

चौके (अमोल गोसावी) : चौके बाजारपेठेतील जीर्ण धोकादायक स्थितीत असलेला विद्युत पोल बदलण्याची मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने अनेकदा करूनही विद्युत मंडळाकडून दखल घेतली नाही. सदरचा विद्युत पोल मालवण कसाल रस्त्याच्या कडेला असून या हम रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते एखाद्या वाहनाची धडक बसून मोठी दुर्घटना होऊ शकते. या पोलवरून घरगुती विज कनेक्शन दिलेली आहेत.मात्र ही गंभीर बाब ग्रामपंचायतीने अनेकदा उप अभियंता मालवण कार्यालयाच्या पत्राद्वारे निदर्शनास आणूनही दखल घेतली गेली नाही.

दरम्यान विद्युत मंडळाकडून वेळकाढूपणा होत असल्याबाबत आज उपसरपंच पी.के.चौकेकर यांनी चौके कार्यालयात भेट देऊन या बाबत विचारणा केली असता शाखा अभियंत्याकडून समर्पक माहिती न देता आपण नवीन आहोत.साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले गेले.याबाबत उपसरपंच पी.के.चौकेकर यांनी उप अभियंता मालवण यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.वरिष्ठ कार्यालयाने याची दखल घ्यावी अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!