खारेपाटण जि.प.केंद्र शाळा येथे वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातून येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ ला देण्यात आलेल्या १२५ लीटर वॉटर प्युरिफाय चे उद्घाटन नुकतेच खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते फित कापून केंद्र शाळा खारेपाटण येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, ग्रा.पं. सदस्य गुरूप्रसाद शिंदे, खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी माजी अध्यक्ष संतोष पाटणकर ,माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे,खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर ग्रामविकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर तसेच ग्रा.पं.सदस्य किरण कर्ले,जयदीप देसाई, मनाली होनाळे,शीतिजा धुमाळे,अमिषा गुरव,दक्षता सुतार, सुहास राऊत आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. खारेपाटण ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून सुमारे ४०,००० /- रुपये खर्च करून खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्याना स्वच्छ व निर्धोक पाणी मिळण्याच्या उद्देशाने हा वॉटर प्युरिफाय शाळेला देण्यात आला असून शाळेच्या विद्यार्थ्याना याचा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी यावेळी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी केले.व खारेपाटण ग्रामपंचायतीचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!