अन्यथा आंदोलन ; युवासेनेचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : सर्वसमान्य जनतेला तलाठी सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी शानानाने तलाठ्यांना सजांमध्ये उपस्थित राहण्याचे (शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२१/ई-१० दि.१८/०८/२०२३) आदेश दिले आहेत. ज्या तलाठ्यांकडे एकापेक्षा जास्त सजेचा कार्यभार दिलेले आहेत. त्या व सर्व तलाठ्यांनी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय येथे दर्शनी भागावर उपस्प्रितीबाबत वेळापत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापही कणकवली तालुक्यातील तलाठ्यांनी सदर शासन आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. व आपलाही याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा १५ दिवसात युवासेने मार्फत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सह शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिला आहे. यावेळी श्री देशपांडे यांनी याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले. यावेळी अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मस्जिद बटवाले, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुका संघटक नितेश भोगले, अनुप वारंग, महेश कोदे, फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे, निसार शेख, जावेद पाटणकर, गौस पाटणकर, इमाम नावलेकर, आदि उपस्थित होते.
