सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पहील्या मायक्रो ए टी एम सेवेचा मान खारेपाटण सोसायटीला
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेने नुकतीच मायक्रो ए टी एम सेवा कार्यन्वयीत केली असून या सेवेचा पहिला बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावच्या खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या संस्थेला मिळाला असून नुकतीच ही मायक्रो ए टी एम मशीन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर व्यवस्थापक श्री नितीन सावंत यांनी सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांचेकडे सुपूर्द केली.
यावेळी जिल्हा बँकेचे उपसरव्यवस्थापक श्री महेश तेरसे, टेक्निकल सपोर्टर श्री सिद्धेश बिरमोळे,खारेपाटण सोसायटीचे व्हाइस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर, संचालक श्री भाऊ राणे,एकनाथ कोकाटे,इस्माईल मुकादम,रवींद्र शेट्ये,मोहन पगारे,उज्ज्वला चीके, संस्थेचे सचिव श्री अतुल कर्ले, खारेपाटण सी एस सी सेंटर च्या ऑपरेटर सौ आस्था आलते आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण सोसायटीच्या जिल्हा बँक पुरस्कृत कॉमन सर्व्हिस सेंटरच्या उद्घाटनाला जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी आले असता त्यांचेकडे खारेपाटण सोसायटीला ए टी एम सेवा उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली होती.या मागणीची जिल्हा बँकेने तात्काळ दखल घेत जिल्ह्यातील पहिले मायक्रो ए टीम सेवा खारेपाटण सोसायटीमध्ये सुरू करण्याची परवानगी दिली असून नुकतेच या सेवेचा प्रारंभ खारेपाटण सोसायटीमध्ये करण्यात आला आहे.
या ए टी एम सेवेमुळे खारेपाटण दशक्रोशीतील नागरिकांना ए टी एम द्वारे आपल्या खात्यातील पैसे काढता व भरता येणार असून तसेच पैसे ट्रान्स्फर करणे,मिनी स्टेटमेंट,ब्यालंस चेक करणे आदी विविध सुविधांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या मायक्रो ए टीम सेवा सुरू करण्याचा सन्मान खारेपाटण सहकारी सोसायटीला प्राप्त करून दिल्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे व बँकेचे अध्यक्ष श्री मनीष दळवी यांचे आभार मानले आहेत. तर ही ए टी एम सेवा हाताळण्यासाठी संस्थेच्या वतीने श्री हरेश विजय मांजरेकर या संस्था कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून प्रथम सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक टू बँक चालणारे हे ए टी एम लवकरच इतर सर्व बँकांना देखील कनेक्ट करून सर्व बँकांमधील ए टी एम धारकांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.तर खारेपाटणच्या शनिवार आठवडा बाजार दिवशी हे मायक्रो ए. टी. एम. बाजार पेठेत ग्रहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव श्री अतुल कर्ले यांनी दिली.















