पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सिं.जि.चर्मकार समाज उन्नती मंडळ पदाधिकाऱ्यांना ग्वाही
संत रविदास भवन निर्मिती चे चर्मकार समाजाचे स्वप्न लवकरच होणार साकार
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या संत रविदास भवनासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा चर्मकार समाज निर्मिती मंडळाला दिले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पालकमंत्री चव्हाण यांची अँड अनिल निरवडेकर यांच्या कार्यालयात भेट घेतली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, अॅड. अनिल निरवडेकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, कणकवली तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण,उपाध्यक्ष सत्यविजय जाधव, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी संत रविदास भवनच्या कामा विषयी व उद्देशा विषयी माहीती जाणून घेतली. सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा बहुद्देशीय असणाऱ्या व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या इमारतीची चर्मकार बांधववांना आवश्यकता असल्याने हे काम होणेसाठी भरीव निधी देण्यात येईल असे त्यांनी आश्वासीत केले. सद्यस्थितीला सुरू असलेल्या कामाचीही माहिती घेऊन मंडळाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.











