वैभववाडी तालुका आत्मा समिती, कृषी विभाग वैभववाडी, रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव संपन्न

महोत्सवातील रानभाजी पाककला स्पर्धेला स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद

वैभववाडी प्र(तिनिधी): वैभववाडी तालुका आत्म समिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग वैभववाडी तसेच रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रान भाजी प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. आजच्या तरुण पिढीला आहारातील रानभाज्यांचे महत्त्व, औषधी गुणधर्म याविषयी माहिती मिळण्यासाठी व आहारातील रानभाज्यांची असलेली परंपरा पुढे चालू राहण्यासाठी त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे यासाठी हा प्रयोग करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे रान भाजी प्रदर्शन व रान भाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आत्मा कमिटीचे अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका कृषि अधिकारी एकनाथ गुरव रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय रावराणे डॉ.प्रशांत गुळेकर, महेश संसारे, विद्या सावंत, मंगेश कदम, महेश रावराणे, रमाकांत यादव, सुनिल रावराणे, राकेश हुले शेतकरी उपस्थितीत होते.

error: Content is protected !!