त्या युवतीवर कारवाई करा

शिवसेना उबाठा अल्पसंख्याक सेलची पोलिसांकडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : पाकिस्तान धार्जिणी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आणि हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियावर करणाऱ्या त्या मुस्लिम धर्मीय युवतीचा जाहीर निषेध करतानाच त्या युवतीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उबाठा अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जीद अब्बास बटवाले यांनी लेखी निवेदनातून कणकवली पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन डीवायएसपी संध्या गावडे, पीआय अमित यादव यांच्याकडे देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक कन्हैय्या पारकर, निसार शेख, राजू राठोड,अनुप वारंग आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!