ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराने आयुष्य संपवलं

सुधीर मोरेंची धावत्या लोकलखाली आत्महत्या

ब्युरो न्युज (मुंबई) : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याचं समजतं. त्यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

.रेल्वे रुळावर गुरुवार (31 ऑगस्ट) रात्री सुधीर मोरे यांचा मृतदेह सापडला. रात्री त्यांना एक फोन आला आणि मी एका वैयक्तिक कामानिमित्त जात आहे असं त्यांनी आपल्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितलं आणि ते घाईत घराबाहेर पडले. त्यांनी बॉडीगार्डला आपल्यासोबत नेलं नव्हतं. गाडी न घेता रिक्षाने गेले. मात्र घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले. तिथे साडे अकराच्या दरम्यान रुळावर झोपले. कल्याणवरुन मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्यावरुन गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येतं आहे. दोन महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॅार्ड करण्यासाठी त्यांनी एक नवीन मोबाईल फोन देखील घेतला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा अशी विनंती सुधीर मोरेंच्या जवळच्या लोकांनी केली आहे.

error: Content is protected !!