ओटव नांदगाव प्रशालेच्या विध्यार्थ्यांची वर्षा सहल उत्साहात!

मसुरे (प्रितिनिधी) : जिल्हा परिषद शाळा ओटव नांदगाव या प्रशालेची वर्षा सहल वैभववाडी तालुक्यातील नापणे या ठिकाणी काढण्यात आली होती. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी सहलीचा आनंद घेतला.यावेळी केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , मुख्याध्यापक आनंद तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परब मॅडम, उपशिक्षिका रूपाली मॅडम, राजश्री धुमाळ ,प्राची गोसावी, लक्ष्मी मांजरेकर, रुपेश नांदगावकर आदी पालक उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणारी विविध पर्यटन स्थळांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून अशा प्रकारच्या सहलीचे आयोजन करावे असे विचार केंद्रप्रमुख कुबल सर यांनी मांडले.नाधवडे ब्राह्मण देव येथील खडकातून येणारे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत(उबाळे )याची पाहणी सुद्धा यावेळी केली. तसेच गवस यांच्या पोल्ट्री फार्मला पण भेट दिली. तेथे असणारे कोंबडी, जर्शी म्हैशी यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतले. केंद्रप्रमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

error: Content is protected !!