उंबर्डे -कोळपे परिसरातील शाळांमधील ४३३ विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विशाल जाधव व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष नासीर रमदुल यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे -कोळपे परिसरातील माध्यमिक विद्यालय उंबर्डे,सिताराम विद्यामंदिर शाळा, प्राथमिक उर्दू शाळा मेहबूबनगर,उर्दू हायस्कूल कोळपे -उंबर्डे मेहबूबनगर या शाळांमधील एकूण ४३३ विद्यार्थ्यांना शेक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडणार व जनतेची गैरसोय होणारे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार.येत्या काळात गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपा बरोबरच अपंग व्यक्तींना आवश्यक साधने,रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीरे असे समाजसेवेचे कार्यक्रम आपण राबविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांनी या प्रसंगी केले.नुकताच उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल,वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्याबद्दल व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशाल जाधव यांचा उंबर्डे -कोळपे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष पदी नासिर रब्दुल यांची निवड झाली त्या निमित्त त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी रसूल मुकादम, उंबर्डे हायस्कूल चे मुख्याध्यापक राठोड सर,पाटील सर,नजरुद्दिन जामदार सर,कांबळे सर,निजाम बोबडे,यासीन बाबडे,यासुर परखाळी आदी प्रमुख मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.














