कणकवली (प्रतिनिधी) : भावी आमदार असा उल्लेख असलेला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना वाढदिवस शुभेच्छांचा तो बॅनर लक्षवेधी ठरत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे.वाढदिनी भावी आमदार असा उल्लेख करत संजय आग्रे यांना फोंडाघाट विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आग्रे हे अत्यंत निकटवर्तीय आहेत. अल्पावधीतच आग्रे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून आपल्या कर्तृत्वा ची छाप राजकारणावर पाडली आहे. त्यामुळेच माजी जि प सदस्य असलेल्या आग्रे यांनी आता विधानसभा लढवत आमदार व्हावे अशी सदिच्छा शिवसेना पदाधिकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भावी आमदार ! ” तो” बॅनर ठरतोय लक्षवेधी











