मा.नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून डॉ सायली महेश कामत यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): दंत वैद्यकीय क्षेत्रातील एमटीएस परीक्षेमध्ये कणकवली मधील डॉ. सायली महेश कामत हीने विशेष प्राविण्य मिळवून यश संपादन केल्याबद्दल कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तिचा सन्मान चिन्ह देत सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, मेघा गांगण, राजू गवाणकर, हर्षदा गवाणकर, दानिश गवाणकर आदी उपस्थित होते. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!