हवेत गोळीबार करणाऱ्यांच्या आंबोलीत आवळल्या मुसक्या

आंबोली (प्रतिनिधी): राजापूर येथे हवेत गोळीबार करून पळालेल्या तिघांना स्विफ्ट गाडीसह नाकाबंदी करून आंबोलीत पोलिसांनी पकडले व रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई पहाटे साडे चार वाजता आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली आंबोली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर हवालदार दीपक शिंदे पोलीस नाईक मनीष शिंदे, महेंद्र मातोंडकर, होमगार्ड चंद्रकांत जंगले यांनी नाकाबंदी करून पकडण्यात आले आणि रत्नागिरी पोलिसांकडे सुपूर्त केले.

error: Content is protected !!