मिलिंद चिंचवलकर हे आंबेडकरी चळवळीचे विश्लेषक व सामाजिक कार्यकर्ते
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली या गावचे सुपुत्र असलेले आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, विश्लेषक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते श्री मिलिंद भिकाजी कांबळे चिंचवलकर यांचे दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले विविध वैचारिक, चिकिस्तक व प्रबोधनात्मक लेख यांचे नुकतेच संग्रहाचा रुपात एकत्रीकरण करण्यात आले असून समजाला एक वेगळी दिशा देणाऱ्या त्यांच्या “दृष्टीक्षेप ” या लेखा संग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.१६ सप्टेंबर २०२३ रोजी सायं.६.०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन दादर,मुंबई येथे रिपब्लिकन सरसेनानी मान. आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
संजय बोपेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई मनपा उपायुक्त चंदा जाधव,डॉ.विजयकुमार अष्टनकर (कार्यकारी अभियंता मुंबई मनपा),माजी पोलीस अधिकारी अँड विश्वास कश्यप,उद्योजक संजयकुमार सूर्यवंशी,सुप्रसिद्ध कवी विचारवंत संजय गायकवाड,ख्यातनाम कवी गायक विष्णू शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमाला सिंपन प्रतिष्ठानचे सचिव बाळकृष्ण जाधव,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुमेध जाधव,सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भिकाजी वर्देकर,रिपब्लिकन सेनेचे भगवान साळवी,लवेश लोखंडे,राष्ट्रीय लोकशाही जनशक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रविभाऊ गरुड,बौध्दजन पंचायत समितीचे पदाधिकारी सुरेश मणचेकर,शिवसेना कार्यकर्ते गजानन भालेकर,साहित्यिक राजेश सावंत, भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे,कवी गायक प्रकाश आजविलकर आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.तरी या प्रकाशन सोहळा कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री मिलिंद चिंचवलकर लेख संग्रह प्रकाक्षण समितीचे प्रमुख निमंत्रक श्री दिलीप उन्हाळेकर व श्री सिद्धार्थ साळवी यांनी संयुक्तिक केले आहे.

