ग्रामपंचायत किंजवडेच्यावतीने इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा 2023 चे आयोजन

देवगड (प्रतिनिधी): ग्रामपंचायत किंजवडेच्यावतीने विविध नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वनिर्मितीतून जोपासुया, वसा पर्यावरण रक्षणाचा या संकल्पनेवरती आधारीत ग्रामपंचायत किंजवडेच्यावतीने इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास रोख रक्कम 3000, व्दितीय क्रमांक 2000, तृतीय क्रमांक 1000 अशी देण्यात येणार आहे.
या स्पर्धेअंतर्गत गणेश मूर्ती तयार करण्यास मार्गदर्शक सूचनेमध्ये मूर्ती शाडू माती, शेतमाती किंवा चिकणमाती पासुन बनवलेली असावी, मूर्ती रंगवताना केवळ नैसर्गिक रंग वापरणेत यावेत, मूर्ती केवळ सहभागी स्पर्धेकाने तयार करणे अनिवार्य आहे, मूर्ती तयार करतानाचा, विविध टप्प्यावरील स्पर्धकासोबत फोटो आणि विडिओ दिनांक 25 सप्टेंबर 2023 3पर्यंत 8080474785 या क्रमांकावर पाठविणेत यावा, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सहभागी स्पर्धकांनी संपर्क साधावा किंवा ग्रामपंचायत किंजवडे कार्यालयासभेट दयावी.

error: Content is protected !!