सरपंच संदीप सावंत यांनी केला सत्कार
कणकवली (प्रतिनिधी): वागदे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संजय अरुण घाडीगांवकर यांची एकमुखाने निवड करण्यात आली. वागदे गावची ग्रामसभा सरपंच संदीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या ग्रामसभेत सर्वानुमते संजय घाडीगांवकर यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरपंच संदीप सावंत यांनी घाडीगांवकर यांचे याबद्दल पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी उपसरपंच शामल गावडे, ग्रामसेवक युवराज बोराडे, ग्रा पं सदस्य नीलम पालव, संजना गावडे, दीपक कदम, पोलीस पाटील सुनील कदम, गोविंद घाडीगांवकर, लक्ष्मण घाडीगांवकर, श्रीधर घाडीगांवकर आदी उपस्थित होते.












