माजी नगरसेवक सचिन काळप यांनी वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी!

मालवण (प्रतिनिधी): कुडाळचे सामाजिक कार्यकर्ते व कुडाळ नगरपंचायतीचे माजी नगरसेवक सचिन काळप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमात जीवनावश्यक साहित्य तसेच रोख स्वरूपात आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली. सचिन काळप हे गोरगरिबांच्या हाकेला नेहमी धावून जाऊन मदत करत असतात.सचिन काळप यांच्या पत्नी सई काळप या सुध्दा कुडाळ नगरपंचायतीच्या विद्यमान नगसेविका म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी माजी नगरसेविका तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उषा आठल्ये, सचिन काळप, हर्षद काळप,शैलेश काळप, केदार काळप,सिद्धेश काळप,कुणाल काळप, सतीश काळप,बाबू गुरव, हर्षद पाटील,सुशील पाटकर, साईनाथ परब आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता.

error: Content is protected !!