खारेपाटण केंद्रस्तरीय तृणधान्य पाक कलाकृती स्पर्धेत प्रियंका गुरव प्रथम

केंद्रातील एकूण ९ शाळांचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी): शासनाच्या वतीने सन २०२३ हे वर्ष तृणधान्य पोषक वर्ष म्हणून जाहीर केले असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा परिषद शाळा मधून पालकांमध्ये जनजागृती व्हावी. विद्यार्थ्याना सकस व पौष्टिक आहार मिळावा.याकरिता शाळास्तरावर व केंद्रास्तरावर तृणधान्य पाकलाकृती स्पर्धेचे आयोजन सर्व शाळांत करण्यात आले होते. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे देखील अशीच केंद्र स्तरीय तृणधान्य पाक कलाकृती स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत खारेपाटण केंद्रशाळा नं. १ च्या पालक प्रियंका स्वप्नील गुरव यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून पुढील होणाऱ्या कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची खारेपाटण केंद्रातून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या कार्यक्रमाला खारेपाटण जि.प. केंद्र शाळेचे उच्चश्रेणी श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांसह जि.प.केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव खारेपाटण ग्रा.प सदस्य शितीजा धुमाळे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संध्या पोरे,खारेपाटण टाकेवाडी संभाजी नगर,गुरववाडी जिप.शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रिया चिके,ग्रामस्थ राजेंद्र चिके,ज्येष्ठ शिक्षिका स्मिता कोरगावकर, सहदेव कोंडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण केंद्रस्तरावर घेण्यात आलेल्या या तृणधान्य पाक कलाकृती स्पर्धेत प्रथम क्रमांक – प्रियंका स्वप्नील गुरव (खारेपाटण केंद्र शाळा नं.१) द्वितीय क्रमांक – शितीजा धुमाळे (जि.प.शाळा रामेश्वर नगर खारेपाटण तर तृतीय क्रमांक रफत शेरीफ नाईक (जि.प.उर्दू शाळा बंदरवाडी खारेपाटण) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला.तर या स्पर्धेचे परीक्षण खारेपाटण केंद्रातील शिक्षक राजू गर्जे, अमोल खोत व मंगेश खांबाळकर यांनी केले. तसेच या स्पर्धेत निधी नितीशकुमार कोंडविलकर (रामेश्वर नगर जि.प.शाळा) श्रावणी श्री कृष्ण राऊत (हसोळटेंब कोंडवाडी जि.प.शाळा) साक्षी गजानन आंबेरकर (जि.प.शाळा नडगिवे नं.१ ) पल्लवी अमोल गुरव (जि.प.शाळा टाकेवाडी खारेपाटण) या शाळेतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना खारेपाटण केंद्राच्या वतीने प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल खोत यांनी केले तर सूत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी मानले.

error: Content is protected !!