एलसीबी ने 8 लाख 32 हजारांच्या दारुसह 38 लाख 32 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
तीवरे आणि कलमठ मधील युवकांना केली अटक
कार मालकाचे कनेक्शन वरवडे – फणसवाडी
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आलिशन्स फॉर्च्युनर कारमधून ( MH 01 – BC – 1616 ) , आणि स्विफ्ट कार मधून (MH 07 AB 5354 ) मुंबईहून गोव्याच्या दिशेने होणारी 8 लाख 32 हजार 800 रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू एलसीबी च्या पथकाने 8 सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता नेमळे येथे नॅशनल हायवेवर पकडली. या कार मालकाचे कनेक्शन वरवडे फणसवाडी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 30 लाखांच्या फॉर्च्युनर कारसह एकूण 38 लाख 32 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एसपी सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक मिलिंद घाग यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे हवालदार प्रकाश कदम, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, पोलीस नाईक चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्यात कणकवली तालुक्यातील कलमठ मोरेश्वर नगर येथील महेश्वर हनुमंत मोरे ( वय 37 ) , आणि तिवरे ( वाळवेवाडी ) गावातील चेतन भरत वाळवे ( वय 27) यांना अटक करण्यात आली असून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












