कणकवली (प्रतिनिधी): शासनाच्या वतीने सन २०२३ हे वर्ष तृणधान्य पोषक वर्ष म्हणून जाहीर केले असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा परिषद शाळा मधून पालकांमध्ये जनजागृती व्हावी विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा याकरिता शाळास्तरावर व केंद्रस्तरावर तृणधान्य पाककलाकृती स्पर्धेचे आयोजन सर्व शाळांत करण्यात आले होते. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा फोंडाघाट नंबर १ येथे देखील अशीच केंद्रस्तरीय तृणधान्ये पाककलाकृती स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळेच्या पालक प्रिया प्रशांत दळवी यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून पुढील होणाऱ्या कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची फोंडाघाट केंद्रातून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. फोंडाघाट केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या तृणधान्य पाककले स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रिया प्रशांत दळवी (शाळा नवीन कुर्ली फोंडाघाट), द्वितीय क्रमांक (विभागून) शारदा रामचंद्र सावंत (शाळा फोंडा गांगोवाडी), मृण्मयी दत्तात्रय रेवडेकर (शाळा केंद्र शाळा फोंडा नंबर १), तृतीय क्रमांक सारिका संतोष खांबाळेकर (शाळा फोंडा सुतारवाडी) सर्व सहभागी शाळा आणि यशस्वी झालेल्या स्पर्धक गृहिणींचे फोंडाघाट केंद्रप्रमुखांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
फोंडाघाट केंद्रस्तरीय तृणधान्य पाक कलाकृती स्पर्धेत प्रिया प्रशांत दळवी प्रथम












