माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा
आमदार नितेश राणेंनीही सुभाष मालंडकर यांचे केले अभिष्टचिंतन
कणकवली (प्रतिनिधी) : स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे चे पदाधिकारी कट्टर राणे समर्थक भाजपा कार्यकर्ता सुभाष मालंडकर यांचे वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे यांनी अभिष्टचिंतन केले. राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर सुभाष मालंडकर वाढदिवसणानिमित्त केकही कापण्यात आला. सायंकाळी उशिरा कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात सुभाष मालंडकर यांचा वाढदिवस मित्रपरिवार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांकडून केक कापून साजरा करण्यात आला.माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी सुभाष मालंडकर यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुभाष मालंडकर हे राणे कुटुंबियांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत. आमदार नितेश राणेंच्या अगदी जवळचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शेतकरी खरेदी विक्री संघ चेअरमन प्रकाश सावंत, स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे चे अचित कदम, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रा पं सदस्य नितीन पवार, मिलिंद चिंदरकर,वरवडे माजी सरपंच संतोष वरवडेकर, माजी उपसरपंच प्रकाश फर्नांडिस, सोहेल खान आदी उपस्थित होते.












