भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची निवड…!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील भाजपचे सक्रिय पदाधिकारी आणि विद्यमान जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी निवड आज निवड जाहिर करण्यात आली. वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यात भाजपच्या अनेक उपक्रमांमध्ये देसाई यांचा सक्रिय सहभाग असतो. राजकारणा बरोबर समाजकारणात ही ते सक्रिय असतात. कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यात त्यांचा हातखंड आहे. तसेच सर्व सामान्यान पासून नेत्यान पर्यंत एकत्रीत राहून संघटन कौशल्य ते दाखवत आहेत. त्यामुळेच आज भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारणीमध्ये त्यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. भाजप मध्ये प्रत्येक कार्यकत्याला न्याय दिला जातो हे यावरुन दिसून येते. बाळू देसाई यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड होताच सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!