धामापूर तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रताप चव्हाण यांची निवड

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते प्रताप चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धामापूर सरपंच सौ. मानसी परब यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते प्रताप चव्हाण यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच रमेश निवतकर,सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते महेश परब, महेश धामापूरकर, बाबू तोरसकर, प्रशांत गावडे, दिनेश ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!