नंदकुमार काळे यांच्या सोबत केली विविध प्रश्नाबाबत चर्चा
आचार (प्रतिनिधी): ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांची सिंधुदुर्ग नगरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ओरस या ठिकाणी संघटनेच्या वतीने सदिच्छा भेट घेतली.या भेटीमध्ये वाहतूक व्यवस्थेबाबत विविध प्रश्नावरती चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गणेश चतुर्थीमध्ये महामार्गावरील सर्व प्रमुख शहरे व महत्त्वाच्या ठिकाणाहून ओव्हर ब्रीजवरुन जाणाऱ्या लक्झरी बस सर्व्हीस रस्त्यावरती प्रवाशांच्या सोयीसाठी थांबतील.तर सावंतवाडी बायपास वरुन जाणाऱ्या सर्व लक्झरी बस गाड्या आकेरी मार्गे सावंतवाडी शहरातून वळविण्यात येणार आहेत.त्यामुळे सावंतवाडी शहरात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होईल.तसेच लक्झरी चालकांनी अवाजवी तिकीट दर आकारल्यास त्यांच्या वरती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.त्याचबरोबर रिक्षा चालकांनी देखील प्रवाश्याकडून अवाजवी भाडे आकारणी केली तर त्यांच्या वरती देखील कारवाईचा बडगा उचलण्यात येईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर राणे, जिल्हा सचिव अर्जुन परब, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफभाई पीरखान,कणकवली तालुकाध्यक्ष सौ.संजना सदडेकर, कणकवली तालुका उपाध्यक्ष सदाशिव राणे,देवगड तालुका संघटक शेखर दोडामणी, देवगड तालुका उपाध्यक्ष ओमकार बोडस, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी,अभय सामंत उपस्थित होते.












