अनंत पिळणकर यांच्या मागणीला यश
कणकवली (प्रतिनिधी): देवगड निपाणी राज्यमहामार्गावर फोंडाघाट आयटीआय तिठ्या वरील धोकादायक वळणावर आज झेब्रा क्रॉसिंग पट्टे तयार करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या मागणीची दखल घेत पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या आदेशानुसार गणेशचतुर्थी च्या आधी एक दिवस झेब्रा क्रॉसिंग पट्टे तयार करण्यात आले. फोंडाघाट आयटीआय तिठ्यावरील धोकादायक वळणावर आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. वाहन चालकाच्या चटकन लक्षात न येणारे हे फसवे वळण अनेक वाहनांच्या अपघाताला कारणीभूत ठरले आहे.अनेक वाहचनचालक या अपघातात जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. संभाव्य अपघात होऊन आणखी कोणी जखमी अथवा जीवितहानी होण्याआधी पिडब्ल्यूडी ने येथे झेब्रा क्रॉसिंग करावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यावेळी पिळणकर यांना गणेशचतुर्थी पूर्वी झेब्रा क्रॉसिंग तयार करण्याचे ग्वाही सर्वगोड यांनी दिली होती.त्यानुसार आज गणेशचतुर्थी पूर्वीच फोंडाघाट आयटीआय तिठ्यावर झेब्रा क्रॉसिंग करण्यात आले आहे.झेब्रा क्रॉसिंग मुळे वाहनांचा वेग कमी होईल आणि संभाव्य अपघात देखील टळतील अशी अपेक्षा व्यक्त करत अनंत पिळणकर यांनी पिडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचे कार्यतत्परतेबद्दल आभार मानले आहेत.