मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवात अंतिम फेरीत ‘धयकालो’ एकांकिकेने पटकावला उत्तेजनार्थ क्रमांक

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवात अंतिम फेरीत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ओरोस,(साई कॉलेज) च्या ‘धयकालो’ एकांकिकेने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. तसेच कु. प्रथमेश साबाजी देसाई व कु. सेजल संतोष शिरवंडकर यांना अनुक्रमे उत्कृष्ट पुरुष व स्त्री अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

१० ऑगस्ट २०२३ रोजी वैभववाडी महाविद्यालयात झालेल्या ५६ व्या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ओरोस च्या ‘धयकालो’ एकांकिकेची अंतिम फेरीसाठी निवड झाली आणि दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यापीठ स्तरावरील अंतिम फेरी नॅशनल कॉलेज बांद्रा येथे पार पडली. या अंतिम फेरीसाठी २४ संघ सहभागी होते. यात ओरोस महाविद्यालयाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. या एकांकिकेमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथमेश साबाजी देसाई, सेजल संतोष शिरवंडकर, साक्षी दिगंबर तेली, दीपक मोहन कदम, ओमकार रविंद्र मालवे, रोशनी विजय पालव, प्राची प्रभाकर गोठणकर, दीपलक्ष्मी चंद्रकांत सावंत या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

     या एकांकिकेचे लेखन व प्रकाशयोजना राहुल संजय कदम, दिग्दर्शन  सत्यवान बाळा गावकर तर संगीतसाथ रोहित संजय कदम यांनी केले. यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. धनंजय तिवरेकर, प्रा. सोमकांत केळुसकर, त्याचप्रमाणे प्रा. नीलिमा रासम, प्रा. सुभाष बांबुळकर, प्रा. सरिता झेमणे, प्रा. प्रियांका चोरगे, प्रा. वैभव कदम, प्रा. प्रचिती पिळणकर यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते विजय पाटकर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!