फोंडाघाट (प्रतिनिधी) : ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या करूळ – चव्हाटा येथील जागृत हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सर्व भाविकांच्या वतीने नुकताच पूर्णत्वास गेला आहे. या करूळ – चव्हाटा येथील जागृत हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी संपन्न होत आहे. याबाबत यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता धार्मिक विधींना सुरुवात, दुपारी बारा वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, रात्री आठ वाजता स्थानिक सुस्वर भजने आणि रात्री नऊ तीस वाजता समई नृत्याचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या संपूर्ण सोहळ्याला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी- भाविकांनी उपस्थित राहून, या आनंद सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे…

