खारेपाटण टाकेवाडी येथील श्री कुंभार देव मंदिराचा वार्षिक उत्सव उत्साहात संपन्न…

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील टाकेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी येथील श्री कुंभारदेव मंदिराचा वार्षिक उत्सव कार्यक्रमास आज गुरवार १७ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत शानदार सूरवात झाली.या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव यांसह युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते व खारेपाटण टाकेवाडी चे सुपुत्र रुपेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

“मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे कुंभार देव हे फार जुने मंदिर असून आता महामार्ग नव्याने झाल्याने महामार्गावरून जाता येता जनतेच्या अगदी सहज नजरेस दिसून येते.खारेपाटण टाकेवाडी येथील ग्रामस्थ आपल्या यथाशक्ती या देवाचा वार्षिक उस्तव साजरा करत असतात.मात्र गावातील इतर मंदिरप्रमाणे या मंदिराचा देखील जीर्णोद्धार होऊन ते नव्याने बांधणे गरजेचे आहे. याकरिता ग्रामस्थानी पुढाकार घेतल्यास खारेपाटण येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामामार्गावर दुर्लक्षित होत चाललेले हे मंदिर पुन्हा एकदा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येईल व गावच्या विकासाला हातभार लागेल.”
रुपेश सावंत

या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य दक्षता सुतार,विजय सावंत,संतोष शेट्ये,ढवळे,बंटी गोसावी,तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने टाकेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मंदिराच्या वार्षिक उस्तव कार्यक्रम निमित्त सत्य नारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ११ वाजता मंदिरात सामूहिक आरती घेण्यात आली.यामध्ये महिला – पुरुष व युवक – युवतो लहान मुले – मुली या सर्वांनीच सहभाग घेतला होता.तर दुपारी १ ते ३ या वेळेत सर्वासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच रात्री १०.०० वाजता खारेपाटण टाकेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री महादेव प्रासादिक भजन मंडळ शिरवली ता.देवगड येथील बुवा सागर मोहिते व रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ मोसम,ता.राजापूर चे बुवा मनोहर सरवणकर यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना ठेवण्यात आला असून या मनोरंजन कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कुंभार देव मंदिर टाकेवाडी,खारेपाटण ग्रमस्थ मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!