कै. श्रीकांतभाई सांबारी यांच्या द्वितीय स्मृतिदिना निमित्त निबंध स्पर्धा……!

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष मा. कै. श्रीकांतभाई सांबारी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंदार सांबारी आणि परिवार यांच्या वतीने निबंध स्पर्धेचे (मालवण तालुका मर्यादित) आयोजन करण्यात आले असून स्पर्धेसाठी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मा. श्रीकांतभाई सांबारी मला भावलेले श्रीकांतभाई सांबारी गरिबांचे कैवारी श्रीकांतभाई सांबारी आचऱ्याचे ‘वैभवशाली’ भूषण श्रीकांतभाई सांबारी हे विषय असून
प्रथम गट – १६ वर्षाखालील (शालेय) शब्दमर्यादा-३०० ते ५०० शब्द
बक्षिसे – प्रथम क्रमांक – ५०१/-
द्वितीय क्रमांक-३०१/-
तृतीय क्रमांक- २०१/-
उत्तेजनार्थ १ – १०१/-
उत्तेजनार्थ २ – १०१/-
द्वितीय गट – १६ वर्षावरील (खुला)
शब्दमर्यादा – ५०० ते १००० शब्द
बक्षिसे – प्रथम क्रमांक – १२५१/-
द्वितीय क्रमांक- १००१/-
तृतीय क्रमांक – ७५१/-
उत्तेजनार्थ १ – ५०१/-
उत्तेजनार्थ २ – ५०१/-

स्पर्धे साठी नियम-
१) निबंध स्वहस्ताक्षरात लिहून श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा येथे दि.३०/४/२०२४ रोजी दुपारी ठीक ३.३० वाजेपर्यंत संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत ग्रंथपालांकडे आणून द्यावा.
२)निबंधाच्या कागदावर स्पर्धकाने नाव लिहू नये. मात्र निबंधाच्या लिफाफ्यावर स्वतःचे नाव, पूर्ण पत्ता व फोन नंबर घालावा.
३)सदरची स्पर्धा मालवण तालुका मर्यादित असली तरीही मालवण तालुक्याच्या बाहेरचे परंतु मालवण तालुक्यात कामकाजानिमित्त असलेले कर्मचारीही या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.
४)सदर निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण कै. श्रीकांतभाई सांबारी यांच्या द्वितीय स्मृतिदिनादिवशी गुरुवार दि.८ मे २०२५ रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता होईल.
५)यावेळी विजयी स्पर्धकाने किंवा त्याच्या नातेवाईकाने उपस्थित राहणे गरजेचे आहे.
६)परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.
७)स्पर्धेच्या आयोजनात किरकोळ बदल करण्याचे अधिकार संस्थेने राखून ठेवले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क फोन नंबर ९४२१२६३३४६ संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत
टीप- आयोजकांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही. परंतु त्यांच्या नातेवाईकांना स्पर्धेत भाग घेता येईल. तसेच ज्या श्रीकांतभाईप्रेमींना स्पर्धेत भाग घ्यायचा नाही पण त्यांच्याबद्दल आपले लिखित मनोगत व्यक्त करायचे आहे. त्यांनी ते संस्थेत आणून द्यावे. ते संग्रही ठेवण्यात येतील. अशी माहिती संस्थेचे ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी दिली आहे.

error: Content is protected !!