महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील निवड पात्र खेळाडू सहभागी होणार
तळेरे (प्रतिनिधी) : कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, बाणेर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे महासचिव सिहान संदीप गाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सदर राज्य स्पर्धेतील विजेते खेळाड २४ व २५ डिसेंबर २०२३ रोजी तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार्या अखिल भारतीय सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद,२०२३ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. तत्पूर्वी कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सर्व जिल्हा सदस्यांनी आप आपापल्या जिल्ह्यातील सब ज्युनिअर खेळाडुंची निवड चाचणी घेऊन विजेत्या स्पर्धकांना या राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य संघटनेकडे कागदोपत्री पूर्तता करावी असे आवाहन राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षकांना यामाध्यमातून केले आहे.ही स्पर्धा कॉमन वेल्थ कराटे फेडरेशन (CKF), साऊथ एशियन कराटे फेडरेशन (SAKF), वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF) व इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी (IOC) यांच्याशी संलग्न असलेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन(KIO) मान्यतेने संपन्न होणार आहे.
तरी या राज्य सब ज्युनिअर कराटे स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी www.karatemaharashtra.in याठिकाणी संकेतस्थळावर वा आमचे कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ( KAM ) चे सिंधुदुर्ग जिल्हाचे अधिकृत प्रतिनिधी श्री. दत्तात्रय मारकड मोबा.नं.९४२२३७३९८४ तसेच राज्य महासचिव संदीप गाडे मोबा.९८९२१५२१९७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या संघटनेच्या वतीने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.