1 लाख 11 हजार 111 रुपयांचे प्रथम पारितोषिक, लाखो रुपयांची अन्य बक्षिसे
6 मे ते 10 मे दरम्यान बावाड मैदान (तरंदळे रोड) ला रंगणार क्रिकेटचा महासंग्राम
कणकवली (प्रतिनिधी) : क्षात्रकुलोत्पन्न मित्रमंडळ गावडेवाडीच्या वतीने खुल्या डे-नाईट टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 6 मे ते 10 मे दरम्यान बावाड मैदान तरंदळे रोड येथे करण्यात आले आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण असणाऱ्या या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये 1 लाख 11 हजार 111 रुपये आकर्षक चषक असे आहे. तर द्वितीय विजेत्या संघास रोख रुपये 55 हजार 555 रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार असल्याची माहिती कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांनी दिली प्रवेश फी 20 हजार रुपये असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरील फक्त 1 खेळाडू आयकॉन म्हणून घेण्यात येईल. (ऑल इंडिया आयकॉन). सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 खेळाडू कर्णधार म्हणून घेण्यात येईल. संघातील इतर 12 खेळाडू लिलावा मध्ये घेण्यात येतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू लिलावामध्ये भाग घेऊ शकतात. टीम घेण्यास इच्छुक असणाऱ्यानी 22 एप्रिल पर्यंत 5000 रुपये ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्यांचा संघ निश्चित केला जाईल. टीम घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अमित लोके मोबाईल 7083801414, अमोल चिंदरकर मोबाईल 9370066769, परेश आचरेकर मोबाईल 9420155951, भूषण खाजणवाडकर मोबाईल 8208505344, दिनेश मसुरकर मोबाईल 9404395016,
विनय हडकर मोबाईल 9822033447, हितेश हरमलकर मोबाईल 9730805008 यांच्याशी संपर्क साधावा.











