कलमठ श्री काशीकलेश्वर मंदिराचा आजपासून जीर्णोद्धार सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : श्री देव काशीकलेश्वर मंदिर जिर्णोद्धार समिती आणि कलमठ ग्रामस्थांच्यावतीने श्री देव काशीकलेश्वर आणि जीर्णोद्धार कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना साेहळा दि.7,8,9 व 10 फेब्रुवारी रोजी माेठ्या भक्तीभावाने साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने दि.7 रोजी सकाळी 8 वा पासून. शाेभयात्रा, कलश मिरवणूक.दि. 8 रोजी सकाळी 7.30 ते 1.30 वाजेपर्यंत शरीरशुद्धी, (पंचगव्य प्राशन), अर्हता सिद्धयर्थ द्रव्याेत्सर्ग कुलेश्वरादि सांग सपरिवार देवतांना श्रीफळ तसेच बहुमानाचे विडे प्रदान, प्रार्थना (गार्हाने), गणेशपूजन, पुण्याहवाचन मातृकापूजन, देवनांदि श्राद्ध, आचार्य वरण, स्थलशुद्धी, प्रकार शुद्धी, शांति हाेम, कौतुक अभिमंत्रण, जलादिवास प्रसादवास्तु, ब्रह्मादि मंडळ देवता आवाहन पूजन, अग्निस्थापना, ग्रहमंडल देवता आवाहन पूजन, जलाधिवास, शय्यनिवास, प्रासादवास्तु ग्रहयज्ञ. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 1.30 वा.पर्यंत प्राकारशुद्धि,स्थापित देवतांचे पूजन, पर्याय हवन इत्यादी.दि.10 रोजी सकाळी 7.30 वा.करवीर पीठाधीश शंकराचार्य यांची सवाद्य मिरवणूक. सकाळी 8 वा. श्रींच्या हस्ते कलशारोहण, प्राणप्रतिष्ठा महापूजा, बलिदानपूजा, आरती, प्रार्थना आशीर्वचन, महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

सोहळ्यानिमित्त दि .8 राेजी दुपारी 3 वा. स्थानिक भजने, सायंकाळी 5 वा. कासरल येथील लिंगेगेश्वर पावणादेवी प्रा. दिंडी मंडळ यांचे वारकरी भजन, रात्री 7 वा.नाटक वस्त्रहरण सादरकर्ते गावडेवाडी स्थानिक कलाकार, रात्री 9 वा.नाटक ए. आपण चहा घ्यायचा.दि.9 राेजी दुपारी 3 वा. स्थानिक भजने, सायंकाळी 5 वा.विट्ठल रखुमाई दिंडी मंडळ यांचे वारकरी भजन,रात्री 7 वा. सुप्रसिद्ध भजन सम्राट भगवान लोकरे (मुंबई) यांचे भजन, रात्री 9 वा.कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचे दशावतारी नाटक अजिंक्यतारा, दि. 10 रोजी दुपारी 3 वा.भजने, सायंकाळी 6 वा. मनोज मेस्त्री यांचे शास्त्रीय गायन, रात्री 7 वा. राज्याभिषेक सोहळा (कुंभारवाडी महिलामंडळ) रात्री 8 वा. ढ.मंडळी कुडाळ यांची वाल्मिकी ही एकांकिका, रात्री 9 वा.इंडियन आयडाॅल फेम गणेश मेस्त्री, सुर नवा ध्यास नवा उपविजेती संजोक्ती जगदाळे, कोकण कन्या ब्रँड फेम तृप्ती दामले, सारेगम पर्व सात उगविजेता प्रसन्न प्रभू तेंडुलकर यांचा स्वरगंध कार्यक्रम होणार आहे

या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीदेव काशीकलेश्वर जिर्णाेद्धार समिती आणि कलमठ ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!