सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते वागदे गडनदी पात्रातील गाळ उपसा शुभारंभ

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नाम फाउंडेशन टाटा मोटर्स चा उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स च्या सहकार्याने वागदे गडनदी पात्रातील गाळ उपसाचा शुभारंभ वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी समीर प्रभूगावकर, बाबू घाडीगांवकर, संजय घाडीगावकर, भाई काणेकर आदी उपस्थित होते. वागदे गडनदी पात्रातील गाळ उपसा करण्यासाठी सरपंच संदीप मेस्त्री यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सरपंच संदीप सावंत यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मंत्री नितेश राणे यांनी तातडीने नाम फाउंडेशन , टाटा मोटर्सच्या माध्यमातून गाळ उपसा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.गडनदी पात्रात वागदे गावातील गाळ उपसा केल्याचा फायदा स्थानिक जलस्रोत वाढण्यात होणार आहे. यामुळे भूजलपातळी  वाढून परिसरातील विहिरी तसेच जलस्रोतांना मुबलक पाणीसाठा मिळेल.

error: Content is protected !!